भोसरीत अतिक्रमण कारवाई | पुढारी

भोसरीत अतिक्रमण कारवाई

भोसरी : पुढारी वृत्तसेवा : ई क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्यावतीने भोसरी परिसरात कारवाई करण्यात आली. यामध्ये 31 हातगाडी, 6 टेम्पो, 2 फ्लेक्स बॅनर, 10 जाहिरात बोर्ड, 6 वजन काटे, एक प्लास्टिकचा टेबल व 267 इलेक्ट्रिक पोल जप्त करण्यात आले. ई क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 3, 4, 5 व 7 मध्ये महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. भोसरी परिसरातील रस्ते, फूटपाथ, विद्युत पोल, सार्वजनिक इमारती यावर अतिक्रमण करून लावण्यात आलेले फ्लेक्स, बॅनर, हातगाड्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

ही कारवाई अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे यांच्या अधिपत्याखाली महापालिका ई क्षेत्रीय अतिक्रमण विभागातील कर्मचारी या पथकाने केली. या वेळी महाराष्ट्र सुरक्षा बल जवान पथक कर्मचारी, एक पोलिस उपनिरीक्षक, 10 पोलिस कर्मचारी, 20 मजूर, 2 जेसीबी, 2 डंपर दोन मनपा कर्मचारी व मजूर यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. महापालिकेच्यावतीने परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Back to top button