डेंग्यूचा डंख खोल! आठ महिन्यांत अडीचशे रुग्ण; दोन हजार जणांची तपासणी | पुढारी

डेंग्यूचा डंख खोल! आठ महिन्यांत अडीचशे रुग्ण; दोन हजार जणांची तपासणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सध्या कोरोनाच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जानेवारी ते ऑगस्ट या सहा महिन्यांमध्ये 2 हजार 153 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 254 रुग्णांमध्ये डेंग्यूचे निदान झाल्याचे महापालिकेकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे. शहरात 2020 मध्ये 2 हजार 970 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 7 नमुने पुणे मनपा कीटकप्रतिबंधक विभागाने राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी 179 रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मार्च 2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने इतर साथीच्या आजारांचे प्रमाण कमी झाले होते.

2020 मध्ये जानेवारी महिन्यात 3, तर फेब—ुवारीमध्ये 4 रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर मार्च ते ऑगस्ट या कालावधीत एकाही रुग्णामध्ये डेंग्यूचे निदान झाले नाही. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात 10, ऑक्टोबरमध्ये 53, नोव्हेंबरमध्ये 61, डिसेंबरमध्ये 48 रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यावर 2021 मध्ये 753 रुग्णांमध्ये डेंग्यूचे निदान झाले. सर्वाधिक सप्टेंबर महिन्यात 192 रुग्ण आढळून आले. यंदाच्या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांमध्ये 254 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. डेंग्यूमुळे 2021 मध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता.

महिना डेंग्यू पॉझिटिव्ह
जानेवारी 16
फेब—ुवारी 28
मार्च 22
एप्रिल 42
मे 18
जून 17
जुलै 62
ऑगस्ट 49

Back to top button