तीन कुत्र्यांवर टाकले अ‍ॅसिड; पाटस येथे गेल्या पंधरा दिवसांतील दुसरी घटना | पुढारी

तीन कुत्र्यांवर टाकले अ‍ॅसिड; पाटस येथे गेल्या पंधरा दिवसांतील दुसरी घटना

पाटस; पुढारी वृत्तसेवा: पाटस (ता. दौंड) गावात अज्ञात व्यक्तींनी तीन कुर्त्यांवर अ‍ॅसिड टाकण्याची खळबळजनक घटना घडली. यात जखमी झालेल्या कुर्त्यांवर वाइल्ड अ‍ॅनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीच्या मदतीने पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी औषधोपचार केले. पाटस येथे गुरुवारी (दि. 18) रात्री अज्ञात व्यक्तींनी तीन कुत्र्यांवर अ‍ॅसिड टाकले. यामुळे ही तीन कुत्री जखमी झाली.

गावातील काही महिलांनी शुक्रवारी (दि. 19) वाइल्ड अ‍ॅनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीचे सदस्य ऋग्वेद रोकडे यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर रोकडे यांनी पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. खंडेराव जगताप यांना बोलावून या कुर्त्यांवर औषधोपचार केले. या कामात हर्षद बंदिष्टी, अक्षय टिक्के, ओंकार पंडित, अर्णव रंधवे, अनिकेत बंदिष्टी, चैतन्य बंदिष्टी, यज्ञेश बंदिष्टी, सुयोग कुलकर्णी, केतन दोशी, गौरव कुलकर्णी यांनी मदत केली.

पंधरा दिवसांपूर्वी गावात अशाच पद्धतीने दोन कुत्र्यांवर अज्ञात व्यक्तींनी अ‍ॅसिड टाकल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. पुन्हा अशीच घटना घडली आहे. याबाबत पाटस पोलिसांत तक्रार करण्यात येणार आहे.

 ऋग्वेद रोकडे, सदस्य, वाइल्ड अ‍ॅनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटी, पाटस

Back to top button