तळेगावला मुख्यमंत्र्यांची धावती भेट | पुढारी

तळेगावला मुख्यमंत्र्यांची धावती भेट

तळेगाव: स्टेशन भागातील मराठा क्रांती चौकात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भिमाशंकरला जाताना शनिवारी २० ऑगस्ट रोजी दुपारी ३.३०च्या सुमारास थांबले असता जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे, संतोष शेळके यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तळेगाव दाभाडे येथील प्रश्न सोडविण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले. जनसेवा विकास समितीचे प्रवक्ते मिलिंद अच्युत, कल्पेश भगत,माजी उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे,निखिल भगत,दिलीप डोळस आणि नागरिक मोठ्या प्रमाणात यावेळी उपस्थित होते.

Back to top button