कोल्हापूरच्या हिम्मतरावने पुण्यातील तरुणांना नोकरीच्या आमिषाने गंडवले | पुढारी

कोल्हापूरच्या हिम्मतरावने पुण्यातील तरुणांना नोकरीच्या आमिषाने गंडवले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मंत्रालयात नोकरीला असल्याची बतावणी करून पुण्यातील सात तरुण तरुणींना नोकरीचे अमिष दाखवत लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. रेल्वेत क्लार्क व महापालिकेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली आहे. हिम्मतराव बाळासाहेब निंबाळकर ( वय. 34, रा. पेठ वडगाव जिल्हा कोल्हापूर ) असे फसवणूक करणाऱ्या मंत्रालयातील तोतया अधिकाऱ्याचे नाव असून त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

याप्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात निबाळकर याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बारामती येथील एका तरुणीने फिर्याद दिली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनेक युवकांना मंत्रालयात आणि राज्यातील विविध शासकीय कार्यालयात नोकरी लावतो अशी बतावणी करून निंबाळकर याने ही फसवणूक केली आहे. पैसे दिल्यानंतर देखील नोकरी मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर फसवणूक झाल्याचे तरुणीला समजले. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

Back to top button