कडाचीवाडी येथून ट्रॅक्टर-ट्रॉली लंपास | पुढारी

कडाचीवाडी येथून ट्रॅक्टर-ट्रॉली लंपास

चाकण : चाकण येथील कडाचीवाडीमधील देवेंद्र पार्क येथून 4 लाख 5 हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर व ट्रॉली अज्ञात चोरट्याने मंगळवारी (दि. 16) रात्री चोरून नेली. याबाबत संभाजी कड (वय 62, रा. कडाचीवाडी) यांनी फिर्याद दिली.

त्यावरून चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कड यांचा फोर्स कंपनीचा ट्रॅक्टर हा ट्रॉलीसह देवेंद्र पार्क, कडाचीवाडी येथे पार्क केला होता. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर व ट्रॉली लंपास केली.

Back to top button