कार्ला : पावसामुळे बळीराजा सुखावला | पुढारी

कार्ला : पावसामुळे बळीराजा सुखावला

कार्ला : जून महिन्यात दडी मारलेल्या पावसामुळे मावळातील शेतकरी चिंताग्रस्त झाला होता; मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. कधी मुसळधार तर कधी संततधार पावसामुळे मावळातील भात खाचरांत तुुडुंब पाणी भरले होते. त्यामुळे अनेकांनी भातलागवडीचे काम पूर्ण केले. त्यामुळे आता ही भातरोपे पावसामुळे चांगलीच तरारली आहेत.

मावळ तालुका भाताचे कोठार मानले जाते. मावळात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होत असल्यामुळे अनेक शेतकरी भातशेतीस पसंती देतात. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाताचे उत्पादन होते. मावळातील शेतकरी पारंपरिक तसेच अत्याधुनिक पद्धतीने भातशेती करतात. मावळ कृषी विभागाकडून शेतकर्‍यांच्या बांधावर जावून त्यांना भातशेतीविषयी मागदर्शन केले जात आहे. सध्या सुरु असलेल्या पावसामुळे मावळातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. लावणी केलेल्या रोपांना जीवदान मिळाले आहे .शेतात भातरोपे तरारली आहे. सगळी राने हिरेवेगार झाली आहेत.

Back to top button