पिंपरी : गांजा ओढणार्‍या चौघांवर गुन्हा | पुढारी

पिंपरी : गांजा ओढणार्‍या चौघांवर गुन्हा

पिंपरी : थेरगाव येथील केजुदेवी मंदिराजवळ गांजा ओढणार्‍या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 10) दुपारी अडीचच्या सुमारास उघडकीस आला. धीरज खंडू भालेराव (20, रा. अशोक नगर, काळेवाडी फाटा) महेश बाबुराव पाटील (22, रा. दत्तनगर, थेरगाव), सोनू राजन तेलंग (24, रा. नखातेनगर,रहाटणी फाटा), इमरान शेख (रा. वेताळ नगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील धीरज भालेराव आणि महेश पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी थेरगाव येथील केजूदेवी मंदिराच्या बाजूला असलेल्या पत्राच्या शेडमध्ये गांजा ओढत होते. याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी छापा मारला.

Back to top button