पुणे : रक्षाबंधनानिमित्त पीएमपीच्या 1812 गाड्या | पुढारी

पुणे : रक्षाबंधनानिमित्त पीएमपीच्या 1812 गाड्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा: यंदाही पीएमपी प्रशासनाने अतिरिक्त गाड्या रस्त्यावर सोडल्या होत्या. तब्बल 1 हजार 812 बस गुरुवारी शहरात धावत होत्या. त्याद्वारे पीएमपीला एकाच शिफ्टमध्ये 90 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले. रक्षाबंधनानिमित्त दरवर्षी बसने प्रवास करणार्‍यांच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे पीएमपी जादा गाड्या रस्त्यावर उतरवते. यंदाही पुणेकरांनी रक्षाबंधनानिमित्त बसमध्ये गर्दी केली होती.

मात्र, पीएमपीने सोडलेल्या अतिरिक्त गाड्यांमुळे प्रवाशांना मोठी मदत झाली. गुरुवारी एकाच दिवसात पीएमपीच्या 1 हजार 812 बस रस्त्यावर धावत होत्या. इतर दिवशी पीएमपीच्या फक्त 1 हजार 600 गाड्या रस्त्यावर धावतात. गुरुवारी या गाड्यांमध्ये पीएमपी प्रशासनाने वाढ केली होती. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली. तसेच, पीएमपीला देखील गुरुवारी चांगले उत्पन्न मिळाले.

रक्षाबंधनानिमित्त आम्ही 1 हजार 812 गाड्या रस्त्यावर
उतरविल्या होत्या. त्याद्वारे एकाच शिफ्टमध्ये पीएमपीला 90 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. अजून दुसर्‍या शिफ्टचे उत्पन्नाची माहिती मिळणे बाकी आहे. दोन्ही शिफ्टचे मिळून पीएमपीला 1 कोटी 75 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे.
– दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

Back to top button