नसरापूर : नसरापूरला झाड कोसळले | पुढारी

नसरापूर : नसरापूरला झाड कोसळले

नसरापूर; पुढारी वृत्तसेवा: नसरापूर येथील धोकादायक झाडाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने हा वृक्ष जोरदार वार्‍यामुळे बुधवारी सायंकाळी कोसळला. रस्त्यावर कोसळलेले झाड बाजूला करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते. झाड कोसळून दोन दुकानांचे मोठे नुकसान झाले. चेलाडी-नसरापूर (ता. भोर) येथील मुख्य मार्गावरील प्राथमिक शाळेतील आवारातील दोन मोठी झाडे बुधवारी (दि. 10) सायंकाळी कोसळली. शेजारील दोन खांबांच्या वीजवाहक तारांमुळे झाड लटकले होते.

शेजारील भांड्याच्या दुकानावर व शाळेच्या आतील आवारातील अंगणवाडी स्वयंपाकशेडवर झाड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. दुचाकीवरून जाणारे प्रवासी व पादचारी सुदैवाने बचावले. झाड़ कोसळल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या साह्याने झाडाची कटिंग करून झाड बाजूला करून रस्ता मोकळा केला. राजगड पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. परंतु, बांधकाम विभागाचे कर्मचारी फिरकले देखील नाहीत.

Back to top button