पिंपरी : तरुणीच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी | पुढारी

पिंपरी : तरुणीच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी

पिंपरी : तरुणीचे वडील, कंपनीतील सहकारी व त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 9) सकाळी साडेनऊच्या सुमारास मुकाईनगर, हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी वीसवर्षीय तरुणीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, अनिकेत कन्हैयालाल मीना (24, रा. मुसाखडी, इंदूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी तरुणी मंगळवारी सकाळी कामावर जात असताना आरोपीने तिला फोन करून मुकाई नगर येथे बोलावले. त्यानुसार, तरुणी आरोपीला भेटण्यासाठी गेली. त्यावेळी आरोपीने तरुणीकडे तिचा मोबाईल मागितला. तरुणीने मोठ्या विश्वासाने आरोपीकडे मोबाईल दिला. दरम्यान, आरोपीने तरुणीच्या मोबाईलवरून तिचे वडील, कंपनीतील सहकारी व त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली.

Back to top button