पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभर संततधार | पुढारी

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभर संततधार

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात आणि परिसरात सोमवारी दुपारनंतर संततधार पावसाने हजेरी लावली. दिवसभरात शहरात 3.3, पाषाण 5.2, लोहगाव 2.6, चिंचवड 1.5, लवळे 3 आणि मगरपट्टा या भागात 1 मिमी पाऊस पडल्याची नोंद पुणे वेधशाळेत झाली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी दुपारनंतर संततधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे काही वेळातच रस्त्यावर जोरदार पाणी वाहिले, तर काही भागांत पाण्याचे डोह साठले होते.

दोन ते तीन तास झालेल्या पावसामुळे शहरातील वाहतूक विस्कळित झाली होती. मात्र, पाऊस थांबल्यावर हळूहळू वाहतूक सुरळीत झाली. 14 ऑगस्टपर्यंत शहरात मध्यम, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान, उपनगरांतही पावसाचा जोर चांगला होता. कात्रज भागात 5, वारजे 4.4, खडकवासला 4.5, तर लोणी काळभोर या भागात 0.6 मिमी पावसाने हजेरी लावली. मंगळवारी घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिवृष्टीसदृश पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

Back to top button