इंदापुरातील ‘ते’ वानर वन विभागाच्या जाळ्यात | पुढारी

इंदापुरातील ‘ते’ वानर वन विभागाच्या जाळ्यात

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : इंदापुरातील विद्यार्थी, पालक आणि शाळा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असलेले नर जातीचे वानर अखेर वन विभागाच्या जाळ्यात अडकले. शुक्रवारी (दि. 5) इंदापूर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि बारामतीच्या वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमने अथक प्रयत्नांनंतर या वानराला दर्गा मस्जिद चौक परिसरात जेरबंद केले.

मागील चार वर्षांपासून हे वानर नारायणदास रामदास हायस्कूलच्या प्रांगणात येऊन विद्यार्थ्यांच्या डब्यावर ताव मारत होते. शुक्रवारी (दि. 5) वनपरिक्षेत्र अधिकारी अजित सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर वन विभागाचे वनरक्षक विशाल शेटे, गणेश बागडे, बाळासाहेब वाघमोडे, निखिल जगताप, बारामतीच्या वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीमने वानराला जेरबंद केले.

Back to top button