पुणे : सराफाच्या दुकानावर कामगाराचा डल्ला | पुढारी

पुणे : सराफाच्या दुकानावर कामगाराचा डल्ला

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मालक बाहेर गेल्यानंतर सराफ दुकानात काम करणार्‍या कामगारानेच लोखंडी कपाटातील मोबाईल, रोकड, सोन्याचे दागिने असा 4 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरी करून पळ काढला. याप्रकरणी प्रोसेनजित करार (वय 35, रा. कोंढवा) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कामगार तन्मय कलीपदा करार (वय 23, रा. कलकत्ता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 28 जुलै रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी करार यांचे भीमपुरा कॅम्प येथील लेन क्रमांक 22 येथे सराफी दुकान आहे. आरोपी हा त्यांच्याकडे काम करत होता. दरम्यान करार हे दुकानाच्या बाहेर गेले होते. त्यावेळी करार याने लोखंडी कपाटातून ऐवज चोरी केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शीतलकुमार गायकवाड करीत आहेत.

 

Back to top button