दिघी अग्निशामक केंद्र विकसित करण्याची गाव विकास समितीची मागणी | पुढारी

दिघी अग्निशामक केंद्र विकसित करण्याची गाव विकास समितीची मागणी

पुढारी वृत्तसेवा: दिघी येथील मनपा आरक्षण अग्निशामक केंद्रासाठी असलेल्या जागेवरील अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी वेगाने विकसित होणाऱ्या दिघी, चऱ्होली, बोपखेल आदी नागरिकांसाठी आवश्यक अग्निशामक केंद्राचा विकास व्हावा अशी मागणी दिघी गाव विकास समितीच्या वतीने करण्यात येत आहे. सध्या या भागातील नागरिकांसाठी भोसरी आणि संत तुकाराम नगर येथील अग्निशामक केंद्रावर अवलंबून राहावे लागत आहे. दिघी येथील या आरक्षित असलेल्या जागेवर कच्चे आणि पक्के बांधकाम झाल्याचे दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक राजेश पाटील यांनी या भागातील नागरिकांच्या सोयीचा विचार करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी अपेक्षा या नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Back to top button