5 पिस्तूल व 6 काडतूस हस्तगत, चाकण व भोसरी येथे कारवाई | पुढारी

5 पिस्तूल व 6 काडतूस हस्तगत, चाकण व भोसरी येथे कारवाई

चाकण : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या पोलिसांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच देशी पिस्तूल व 6 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. यातील एक कारवाई चाकण (ता. खेड) येथे करण्यात आल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पहिल्या कारवाईत चाकण पोलिसांनी नितीन थिटे (वय 25, रा. रेटवडी, ता. खेड) या आरोपीस अटक केली आहे. त्याच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलिस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी (दि. 27) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर चाकणजवळील नाणेकरवाडी हद्दीतील उड्डाणपूल येथे नितीन थिटे याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे 1 देशी बनावटीचे पिस्तूल व 2 जिवंत काडतूस बेकायदेशीररीत्या मिळाली. चाकण पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसर्‍या प्रकरणात एमआयडीसी भोसरी पोलिसांनी वेदांत माने (वय 25, रा. लांडेवाडी, भोसरी) या आरोपीस अटक केली आहे. त्याच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलिस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (दि. 27) संध्याकाळी 4 वाजता इंद्रायणीनगर, भोसरी येथे त्याच्या ताब्यात 1 लाख रुपये किमतीचे 4 गावठी पिस्तूल व 1 हजार 200 रुपये किमतीचे चार जिवंत राऊंड बेकायदेशीररीत्या मिळाली असल्याचे कारवाई करणार्‍या पथकातील पोलिसांनी सांगितले.

Back to top button