पिंपरी : दरवाजाचे लॉक तोडून दागिने चोरीला | पुढारी

पिंपरी : दरवाजाचे लॉक तोडून दागिने चोरीला

पिंपरी : दरवाजाचे लॉक तोडून चोरट्यांनी घरातील पितळी भांडी आणि सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 26) सकाळी दळवीनगर, चिंचवड येथे उघडकीस आली. याप्रकरणी महिलेने अज्ञात चोरट्याच्या विरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिलेच्या घराचे लॉक तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील कपडे अस्ताव्यस्त करून पितळी भांडे आणि सोन्याचे दागिने असा एकूण 33 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार 20 ते 26 जुलै या कालावधीत घडला.

Back to top button