ड्रेनेजच्या दुर्गंधीने दिघीकर त्रस्त, आरोग्याच्या समस्या वाढल्या | पुढारी

ड्रेनेजच्या दुर्गंधीने दिघीकर त्रस्त, आरोग्याच्या समस्या वाढल्या

भोसरी : पुढारी वृत्तसेवा : दिघी येथील साई पार्क परिसरातील नागरिक ड्रेनेज लाईनच्या पाण्याच्या दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. नाला वारंवार तुंबत असल्याने परिसरातील नागरिकांना विनाकारण या दुर्गंधीचा सामना करवा लागत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ड्रेनेजमध्ये पाणी व कचरा सचल्याने दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांना दारे खिडक्या बंद ठेवूनच घरात वावरावे लागत आहे. महापालिका प्रशासनाने तक्रारीचे दखल घेत ही समस्या कायमची सोडविण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. येथील परिसरातील नाल्यामध्ये दुर्गंधीयुक्त पाणी व कचरा तुंबणे हे नित्याचे झाले आहे.

मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त पाणी साठत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. ही समस्या येथील परिसरातील नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. येथील समस्यांचा परिसतील घरांना दुर्गंधीयुक्त पाण्याचा त्रास होत आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाकडे याबाबत वारंवार तक्रार देऊनही काहीच ठोस उपयोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

याबाबत वेळीच उपयोजना केली नाही तर साथीचे आजारांना आमंत्रण मिळेल. अनेक वेळा तक्रार देऊनही महापालिकेचा संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या दुर्गंधी व मैलायुक्त पाण्याचा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

Back to top button