पुणे विभागातील नऊ गावे भर पावसाळ्यातही तहानलेलीच! | पुढारी

पुणे विभागातील नऊ गावे भर पावसाळ्यातही तहानलेलीच!

पुणे : पुणे विभागात गेले काही दिवस अतिवृष्टी झाली. मात्र, शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार अजूनही विभागातील पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत नऊ गावे आणि 46 वाड्यांतील सुमारे पंधरा हजार नागरिकांना नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक पाच गावे आणि 28 वाड्यांतील सहा हजार 498 नागरिकांना तीन टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.

हे सर्व टँकर माण तालुक्यात सुरू आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात चार टँकरच्या मदतीने दोन गावांतील सहा हजार 500 आणि आंबेगाव तालुक्यातील एका गावातील 320 नागरिकांना एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सांगलीतील जत तालुक्यात एक गावात एक टँकर सुरू असून, त्या ठिकाणच्या 1,539 नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे सुरू असलेले नऊही टँकर खासगी आहेत.

Back to top button