येरवडा : उद्यान विभागाकडून जुन्या नियमावलीनुसार निविदा प्रक्रिया | पुढारी

येरवडा : उद्यान विभागाकडून जुन्या नियमावलीनुसार निविदा प्रक्रिया

येरवडा : महापालिकेची निविदा (टेंडर) प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबिवली जाते. ठेकेदारांना 2022च्या नियमांवलीनुसार या प्रक्रियेत सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. मात्र, उद्यान विभाग 2016-17च्या जुन्या नियमांवलीनुसार टेंडर प्रक्रिया राबवीत असल्याने ठेकेदारांचे नुकसान होत आहे. नवीन नियमावलीत कमी दराने आलेल्या एजन्सीला अनामत रक्कम भरलेला डीडी आठ दिवसांत जमा करण्यासाठी मुदत आहे. मात्र, उद्यान विभागाने अनामत रकमेच्या डीडी भरण्याच्या नियमावलीत बदल केला नाही.

टेंडर भरताना डीडी असणे आवश्यक केले आहे. त्यामुळे एजन्सीने जरी सर्वांत कमी दराने निविदा भरली तरी, अनामत रकमेचा डीडी जमा केला नसल्याने एजन्सी अपात्र ठरत आहे. यामुळे उद्यान विभागाने ही प्रक्रिया नवीन नियमांनुसार राबविण्याची मागणी ठेकेदारांनी केली आहे. उद्यान विभागाचे अधीक्षक अशोक घोरपडे म्हणाले, “नवीन नियमावलीनुसार टेंडर प्रक्रिया राबविली जाते आहे. एजन्सींकडून डीडी जमा करायचे राहिला असल्यास नवीन नियमांवलीनुसार ते देखील जमा केले जातात.

Back to top button