पुणे : माहिती अधिकार कार्यकर्त्याला कोठडी | पुढारी

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्त्याला कोठडी

पुणे : दंडात्मक कारवाई टाळायची असेल, तर मला दोन कोटी रुपयांची खंडणी द्यावी लागेल, असे धमकावत त्यातील 25 लाख रुपये स्वीकारणार्‍या तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्याला न्यायालयाने 25 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दत्तात्रेय गुलाबराव फाळके (वय 46, रा. तळजाई पठार, धनकवडी), असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

संबंधित ठेकेदाराने याबाबत खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी (ता. 19) फाळके याला अटक केली आहे. एका बांधकाम ठेकेदाराकडे त्याने ही खंडणी मागितली होती. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली. या गुन्ह्यात फिर्यादींच्या वतीने अ‍ॅड. हेमंत झंजाड कामकाज पाहात आहेत.

Back to top button