पिंपरी : खंडणी मागितल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल | पुढारी

पिंपरी : खंडणी मागितल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  फळ विक्रेत्याला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 3 मे 2022 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास थेरगाव येथे घडली. याप्रकरणी लक्ष्मण कृष्णदेव शेरखाने (वय 34, रा. शिवतीर्थनगर, थेरगाव) यांनी बुधवारी (दि. 20) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, सनी उर्फ नितीन राकेश सौदाई (30, रा. सुभाष नगर, रिव्हर रोड, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे थेरगाव येथे फळ विक्री करीत होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी सनी सौदाई याने फिर्यादी यांना व्यवसाय सुरू ठेवायचा असल्यास 20 हजा र रुपये द्यावे लागतील.

पैसे न दिल्यास मारण्याची धमकी दिली. विशेष सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी सनी सौदाई याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वाकड पोलिस करीत आहेत.

Back to top button