पिंपरी : महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीची चोरी | पुढारी

पिंपरी : महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीची चोरी

पिंपरी :  चिंचवड येथील शाहुनगरमधील पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सव्वा दोन तोळे वजनाचे साठ हजार रूपये किंमतीचे सोने दुचाकीवर आलेल्या चोरांनी पळविले आहे. ही घटना शनिवारी (16 रोजी) सव्वाआठ वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला फिर्यादी पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील साठ हजार रूपये किंमतीचे सोने हिसका मारून पळविले आहे. महिलेने शनिवारी (दि.17) भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी चोरट्यांवर कलम 392, 34 अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Back to top button