शेळ्या चोरणारी टोळी जेरबंद, कुरकुंभ पोलिसांची नागरिकांच्या मदतीने कारवाई | पुढारी

शेळ्या चोरणारी टोळी जेरबंद, कुरकुंभ पोलिसांची नागरिकांच्या मदतीने कारवाई

कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा : सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या वाहनाच्या नंबरवरून शेळ्या चोरणाऱ्या टोळीला नागरीकांच्या मदतीने कुरकुंभ (ता. दौंड) पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत चार जणांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १५) करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कुरकुंभ येथील समाज मंदिराजवळ रस्त्यालगत शेळ्या चरत होत्या. अज्ञात चोरट्यांनी शेळ्या उचलून स्कॉर्पिओ गाडीत टाकून फरार झाले होते. हा प्रकार ४ जुन २०२२ घडला होता. या घटनेनंतर नागरीकांनी स्कॉर्पिओ गाडीचा नंबर (एम.एच १४ ए.एम ६५८८) पाहिला होता. तो नंबर सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.

शुक्रवारी (दि. १५) या नंबरची गाडी कुरकुंभ परिसरात पुन्हा दिसून आली. पोलीसांनी रस्त्यावर स्कॉर्पिओ गाडी थांबवून तपासणी केली असता. गाडीत पुन्हा चोरून आणलेल्या ३ शेळ्या आढळून आल्या. यादरम्यान स्कॉर्पिओसह चार संशयिताना ताब्यात घेतले आहे. शंकर हनुमंत गायकवाड, संजय किसन जाधव, बजरंग मारुती जाधव (सनदनगर सोलापुर), आकाश रमेश भोसले (रा. अक्कलकोट, ता. जि. सोलापुर) असे अटक केलेल्याची संशयितांची नावे आहे.

याबाबत दादा किसन गायकवाड (वय ७०, रा. कुरकुंभ समाज मंदिराजवळ, ता. दौड) यांनी फिर्याद दिली आहे. या कामगिरीत सहायक फौजदार अनिल कोळेकर, पोलीस हवालदार शंकर वाघमारे, अमोल राऊत, पोलिस स्वप्नील कांबळे, अविनाश साळुंके, सुरज साळुंके, राजु भिसे, यांचा समावेश होता.

Back to top button