पिंपरी : पावसामुळे शहरातील रस्त्यांची चाळण | पुढारी

पिंपरी : पावसामुळे शहरातील रस्त्यांची चाळण

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मागील आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे ठेकेदारांच्या कामाचे उघडे पडले आहे. रस्त्यावरील खड्डे आणि डांबर उडून गेले आहे. गेल्या वर्षभरापासून शहरातील कानाकोपर्‍यातील रस्त्यांची कामे सुरू होती. रस्त्याच्या कामामुळे शहरात सर्वत्र धुळ उडत होती. मात्र, आपले रस्ते चांगले होतील या आशेवर असलेल्या नागरिकांच्या पदरी निराशा पडली आहे.

 

भर पावसात सिग्नल सुटल्यावर मार्ग काढत माझ्या दुचाकीने वेग घेतला. गाडी समोर जाते न जाते तेवढ्यातच धाडकन आवाज आला. पावसामुळे समोरच्या खड्ड्याचा वेध घेता आला नाही. समोरचे चाक खड्ड्यात गेल्याने बॅलन्स गेला आणि भर पावसात गाडीसकट रस्त्यावर पडलो.नशीब बलवत्तर म्हणून पाठीमागे कुठले अवजड वाहन नव्हते. नाही तर मोठा अपघात झाला असता. अचानक मोठा झटका लागल्याने पाठ आणि कंबरेचे दुखणे वाढले आहे. सोबतच वाहन दुरूस्तीचा खर्चही रस्त्यातील खड्डयांमुळे भेट म्हणून मिळाला आहे.
                                                    – संजय चव्हाण, वाहनचालक, तळवडे

 

 

Back to top button