घराजवळ पार्क केलेली दुचाकी पळवली | पुढारी

घराजवळ पार्क केलेली दुचाकी पळवली

खडकी : घराजवळ पार्क केलेले दुचाकी वाहन अज्ञात चोरट्याने चोरून नेले. 512 ऑर्डनन्स फॅक्टरी रस्त्यावर गवळीवाडा दर्गा वसाहत येथील ज्युपिटर गाडी चोरट्यांनी पळविली. याबाबत खडकी पोलिसांकडे नितीन शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गवळीवाडा येथे राहणारे पेपर विक्रेते नितीन शिंदे यांनी घराजवळ निळ्या रंगाची दुचाकी ज्युपिटर गाडी एमएच 12 आरझेड 8286 पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दुचाकीचे कुलूप तोडून गाडी पळवली. या घटनेची छायाचित्रण सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. सीसीटीव्ही छायाचित्रांमध्ये एका दुचाकीवरून दोघे जण येऊन शिंदे यांची दुचाकी गाडी लॉक तोडून पळवून नेण्याची घटना चित्रित झाली आहे.

Back to top button