मोबाईल, बॅग चोरीच्या पुण्यात तीन घटना | पुढारी

मोबाईल, बॅग चोरीच्या पुण्यात तीन घटना

पुणे; पुढारी वृत्तसेवा: चतु:शृंगी, कोरेगाव पार्क आणि सिंहगड रोड भागात मोबाईल व बॅग चोरीच्या तीन घटना घडल्या. चतु:शृंगीमध्ये बाणेर-बालेवाडी सर्व्हिस रस्त्यावर पादचारी तरुणाच्या हातातील 10 हजारांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला आहे. या प्रकरणी श्रीकृष्ण उबरहांडे (वय 30) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यावरून दुचाकीवरील दोघांवर गुन्हा नोंद आहे. दुसरी घटना कोरेगाव पार्कमधील नॉर्थ मेन रोडवरील जर्मन बेकरीजवळ मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास घडली. दुचाकीवरून आलेल्या मास्क घातलेल्या तीन चोरट्यांनी मैत्रिणीसोबत दुचाकीवरून जाणार्‍या 24 वर्षीय तरुणाकडील लॅपटॉप व इतर ऐवज असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून नेली.

त्याचा गुन्हा कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाकडून सातारा रस्त्याने जाताना दोन तरुणांच्या हातातील दोन मोबाईल चोरट्यांनी हिसकावून नेले. कोंढव्यातील हनुमान मंदिरात चोरी कोंढव्यातील शिवनेरीनगरमधील आंबेडकर चौकातील हनुमान मंदिरातून चोरट्यांनी दानपेटीत जमा झालेली 12 हजारांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी महेंद्र लक्ष्मण गव्हाणे (44, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे.

Back to top button