Beed News : नाखलगावात वीज पडून बैलजोडीचा मृत्यू ; तर चिमुकलीला विजेचा चटका

Beed News : नाखलगावात वीज पडून बैलजोडीचा मृत्यू ; तर चिमुकलीला विजेचा चटका
Published on
Updated on

दिंद्रुड, पुढारी वृत्तसेवा : नाखलगाव येथे गुरुवारी (दि.6) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसात बैलजोडीवर वीज कोसळल्याने बैलांचा‌ जागीच मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घडली. यामध्ये शेजारी खेळत असलेल्या सात वर्षांच्या मुलीला वीजेचा धक्का लागल्याने तिला किरकोळ इजा झाली आहे.

नाखलगाव येथील अल्पभूधारक शेतकरी बाबूराव किसन झोडगे हे शेतामध्ये काम करत होते. दरम्यान बैल मशागतीची कामे आटोपून मोकळ्या शेतात बैलगाडीला बैलांना बांधून ठेवले होते. पावसाला सुरुवात होण्याअगोदर वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट चालू होता. या वेळी झोडगे यांच्या दोन्ही खिल्लार बैलांवर वीज पडल्याने बैलांचा जागीच मृत्यू झाला.

यासोबतच झोडगे यांची नात स्वरा दत्ता झोडगे हिला देखील बैलाजवळ खेळत असताना विजेचा चटका बसल्याने किरकोळ इजा झाली आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान माजलगाव पशुवैद्यकीय अधिकारी शेजुळ इंगळे, तलाठी मोरे यांनी घटनास्थळी मृत बैलांचा तात्काळ पंचनामा केला असून, पीडित शेतकऱ्यास मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news