पुणे शहरात उद्यापासून मोफत बूस्टर डोस | पुढारी

पुणे शहरात उद्यापासून मोफत बूस्टर डोस

पुणे; पुढारी वृत्तसेवा: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 15 जुलैपासून पुढील 75 दिवस 18 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना सरकारी लसीकरण केंद्रांमध्ये बूस्टर डोस मोफत दिला जाणार आहे. शहरात शुक्रवारपासून पावणेचार लाख नागरिकांना 68 सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत बूस्टर डोस मिळू शकणार आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने किंवा प्रत्यक्ष लसीकरण केंद्रांवर जाऊन नोंदणी करता येणार आहे. 68 लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सध्या शहरात 38 लाख लोकांनी पहिला डोस घेतला आहे. 18 वर्षांपुढील 5 लाख 24 हजार 492 नागरिकांचा दुसरा डोस, तर 3 लाख 86 हजार 007 जणांचा तिसरा डोस घेणे बाकी आहे.

18 वर्षांपुढील नागरिकांचा लसीकरणाचा अहवाल
18 वर्षांपुढील लोकसंख्या
42 लाख 10 हजार 592

पात्र लाभार्थी
3 लाख 30 हजार 334

पहिला डोस पूर्ण
37 लाख 16,204 (111 टक्के)

दुसरा डोस झालेले लाभार्थी
31 लाख 42,436 (94 टक्के)

तिसरा डोस : 3 लाख 59,863

शहरात आतापर्यंत 18 ते 45 वर्षे वयोगटातील 87 हजार जणांनी बुस्टर डोस घेतला आहे. 45 ते 60 वर्षे वयोगटातील 51 हजार 234 नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे. 60 वर्षांवरील 1 लाख 64 हजार 679 नागरिकांना बुस्टर डोस मिळाला आहे.

 

 

Back to top button