पुणे : पिंपळगाव येथील नदीपात्र झालीत कचराकुंडी | पुढारी

पुणे : पिंपळगाव येथील नदीपात्र झालीत कचराकुंडी

शेलपिंपळगाव : पुढारी वृत्तसेवा : भीमा आणि भामा ह्या नद्यांचा पिंपळगाव (ता. खेड) या ठिकाणी संगम आहे. मात्र, सध्या हा संगम आणि नदीपात्र कचराकुंडी झाली आहे.

भीमा आणि भामा या नद्यांनी पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील कित्येक तालुक्यांना समृद्ध केले आहे. नदीच्या पाण्यावर ऊस शेतीच नव्हे तर इतरही पीक शेतीला उज्ज्वल दिवस आले आहेत, परंतु याच नदी संगमाठिकाणी आजूबाजूच्या हॉटेल व्यावसायिकांकडून तसेच चाकण-शिक्रापूर मार्गाने वाहतूक करणार्‍या गाड्यांमधून कुठेही न टाकता येणारा कचरा टाकण्यात येतो. परिणामी हे ठिकाण म्हणजे कचराकुंडीच झाली आहे.

या घनकचर्‍याचे विघटन होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिणामी परिसरातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. नदीपात्राचे सौंदर्य देखील बकाल झाले आहे. याबाबत त्वरित संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Back to top button