बारामती-शिर्सुफळ एसटी पुन्हा चालू करा | पुढारी

बारामती-शिर्सुफळ एसटी पुन्हा चालू करा

उंडवडी : पुढारी वृत्तसेवा : बारामती ते शिर्सुफळला जाणारी एसटी सेवा बंद झाल्याने विद्यार्थी यांची मोठी गैरसोय होत आहे. कोरोना काळात एसटी सेवा बंद झाली होती. दरम्यान, मध्यंतरी दोन-तीन दिवस ती शिर्सुफळला नेहमीप्रमाणे आली; परंतु नंतर पुन्हा बंद झाल्याने एसटी सेवा नियमित सुरू करण्याची मागणी होत आहे.

जूनपासून शाळा नियमित चालू झाल्याने शिर्सुफळ तसेच वाड्यावस्तींवरील मुले बारामतीला शिक्षणासाठी जात आहेत. परंतु, एसटी नसल्यामुळे खाजगी बसने ये-जा करावी लागत आहे. शिवाय जादा पैसे देऊनही वेळेवर मुलांना शाळेत जाता येत नसल्यामुळे मुलांची मोठी गैरसोय होत आहे. एकीकडे शासन मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून प्रयत्न करीत आहेत, तर दुसरीकडे बसची सोय नसल्याने मुले शिक्षणापासुन वंचित राहत असल्याचे चित्र शिर्सुफळ येथे पहायला मिळत आहे.

जवळपास एक वर्षापासून बारामती-उंडवडी सुपे मार्गे शिर्सुफळला जाणारी एसटी बंद असल्याने मुलांना शाळेत जाणे कठीण झाले आहे. मुलांना जीव धोक्यात घालून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने लवकरात लवकर एसटी सेवा सुरू करावी.
अजित आटोळे, पालक

Back to top button