घोडेगाव पोलिस ठाण्यात दहा सीसीटीव्ही कॅमेरे | पुढारी

घोडेगाव पोलिस ठाण्यात दहा सीसीटीव्ही कॅमेरे

मंचर : पुढारी वृत्तसेवा : घोडेगाव येथील पोलिस ठाण्यात दहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या माध्यमातून पोलिस ठाण्यातील हालचालींवर ग्रामीण पोलिस अधीक्षकांचे लक्ष राहणार आहे. मुंबई उच्च न्यायालय तसेच गृह विभागाने राज्यातील सर्वच पोलिस ठाण्यांतील कामकाजावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार, घोडेगाव पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. पोलिस ठाण्याचे प्रवेशद्वार, ठाण्यातील खोल्यामधील आवार, पोलिस अधिकार्‍यांच्या खोल्या, चार्जरूम, लॉकअप आदी आवश्यक ठिकाणी कॅमेरे लावले आहेत. या कॅमेर्‍यामधील दृश्यांवर नजर ठेवण्यासाठी पोलिस ठाणे प्रमुखाच्या कक्षात 32 इंच एलईडी टीव्ही ठेवला आहे.

याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने म्हणाले, ‘पोलिसांच्या कामात पारदर्शकता आणणे, पोलिसांचा कार्यभार लोकाभिमुख करणे हा सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यामागील उद्देश आहे. नागरिकांना तत्काळ सेवा पुरवणे, तसेच पोलिस ठाण्याची सुरक्षितता मजबूत करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.’

Back to top button