पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये पावसाची हुलकावणी | पुढारी

पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये पावसाची हुलकावणी

 पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: या वर्षी पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना प्रचंड उकाड्याचा त्रास जाणवत आहे. पुणे आणि मुंबईच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहर सर्वाधिक उष्ण शहर ठरत आहे. यंदा पाऊसही त्या मानाने जोरदार होण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र, सध्या पावसाळ्याचे दिवस असून, शहराला पाऊस हुलकावणी देत आहे. शहरातील आसपासच्या भागांमध्ये आणि जिल्ह्यामध्ये पाऊस आहे. मात्र, शहरामध्ये ढगाळ वातावरण कुठे हलक्या सरी पडतात, तर कुठे जोराची सर येते. पण, पुन्हा ऊन-पावसाचा खेळ सुरू होतो.

शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच शहरात टप्प्यावर हवामान बदलत असते. ज्या ठिकाणी बागा, उद्याने, नद्या आहेत, त्या ठिकाणी तापमान कमी असते. तिथून जसेजसे दूर येतो, तसे तापमान वाढत जाते. दुर्गादेवी टेकडीसारख्या ठिकाणी तापमान कमी असते. नदीच्या पाण्याचे प्रदूषण वाढले आहे. शहरातील अंडरग्राऊंड नाल्यातील 60 टक्के ‘सी वेज वॉटर’ नदीला मिळत आहे. त्यामुळे पाण्यातील कार्बनडाय ऑक्साईड वाढत चालला आहे. मात्र, वाढते शहरीकरण, महाकाय वृक्षांची संख्या कमी, खालावलेली भूजल पातळी, सिमेंट रस्ते, जल आणि वायू प्रदूषण या सर्व कारणांमुळे शहराच्या वातावरणात मोठा बदल होत आह

Back to top button