जिल्ह्यात पावसाअभावी 13 टक्केच पेरण्या | पुढारी

जिल्ह्यात पावसाअभावी 13 टक्केच पेरण्या

पुणे: पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या मंदावल्या आहेत. सद्य:स्थितीत 24 हजार 605 हेक्टरवर म्हणजे सुमारे 13 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. पुरेसा पाऊस व जमिनीत ओलावा झाल्याशिवाय शेतकर्‍यांनी पेरण्यांची घाई करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले आहे.

जिल्ह्यात जून महिन्याच्या 176 मिलिमीटर पावसाच्या तुलनेत 83 मिलिमीटर म्हणजे सुमारे 47 टक्के पावसाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात 75 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस 6 तालुक्यांत झालेला आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष झालेले पर्जन्यमानामध्ये बारामती 109 मिलिमीटर, आंबेगाव 107, जुन्नर 126, इंदापूर 98, शिरूर 85, दौंड 89 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे

Back to top button