वाकड : झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी | पुढारी

वाकड : झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी

वाकड : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडून पावसाळ्याआधी वाकड परिसरातील झाडांच्या वाढलेल्या धोकादायक फांद्या तोडण्यात आल्या आहेत. वाकडमधील यमुनानगर परिसरात रोडच्याकडेला निलगिरीची दहा ते पंधरा झाडे असून ती झाडे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. या वाढलेल्या झाडांमुळे वारे सुटल्यानंतर त्याच्या फांद्या तुटून खाली पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे परिसरातील सोसायट्यांमध्ये राहणार्‍या नागरिकांनी झाड्यांच्या फांद्या तोडण्याची मागणी केली हेाती. त्यानुसार महापालिकेच्यावतीने वाढलेल्या झाडांच्या फांद्याची छटाई करण्यात आली आहे. यामुळे परिसरात काही वेळ वाहतूककोंडी झाली होती. झाडांच्या फांद्यांची छटाई झाल्यानंतर कचरा तसाच रस्त्याच्याकडेला पडला असून, लवकरात लवकर कचरा उचलण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

Back to top button