पुणे : जिल्ह्यातील 43 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा | पुढारी

पुणे : जिल्ह्यातील 43 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

पुणे : जून महिना संपला, तरी अद्याप पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने सध्या जिल्ह्यातील 99 हजार 279 लोकसंख्या तहानलेलीच असल्याचे विभागीय आयुक्तालयाकडून सांगण्यात आले. सध्या नऊ तालुक्यांमधील 43 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

सर्वांत जास्त पाणीटंचाईची झळ आंबेगाव तालुक्याला बसत असून, या ठिकाणी 11 गावांमधील 23 हजार 795 बाधितांना 13 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी 14 विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ शिरूर तालुक्यात सहा गावांमधील 19 हजार 500 हून अधिक बाधितांना 12 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या ठिकाणी दहा विंधनविहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

Back to top button