पिंपरी : बुलेटमधून फट्फट् ; तिघांवर गुन्हा दाखल | पुढारी

पिंपरी : बुलेटमधून फट्फट् ; तिघांवर गुन्हा दाखल

पिंपरी : बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून फटाक्यांचा आवाज काढणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगरण्यात आला आहे. मंगळवारी (दि. 28) दिघी आणि चाकण पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिघी पोलिस ठाण्यात माणिक पवार (21, रा. वडमुखवाडी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाकण पोलिस ठाण्यात शुभम अरुण चांदणे (19, रा. आंबेठाण चौक, ता. खेड), शंकर विठ्ठल मुंगसे (55, रा. रासे, ता. खेड) अशी गुन्हे दाखल करण्यात आलेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पिंपरी-चिंचवडचा पदभार स्वीकारल्यानंतर फटाक्यांचा आवाज काढणार्‍या बुलेटस्वारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार, मध्यंतरी वाहतूक विभागामार्फत 346 बुलेटस्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी पुन्हा कारवाईला सुरुवात केली आहे. आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 279 आणि 290 आणि केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले.

Back to top button