पुणे : हुतात्मा राजगुरू स्मृतिशिल्प परिसराचे सुशोभीकरण | पुढारी

पुणे : हुतात्मा राजगुरू स्मृतिशिल्प परिसराचे सुशोभीकरण

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा राजगुरु, भगतसिंग, सुखदेव यांचे योगदान मौलिक आहे. देशभक्तीचे ज्वलंत तीर्थक्षेत्र असलेल्या स्मृतीशिल्प पावित्र्याचे व परिसर सुशोभीकरण अबाधित ठेवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार, असे मत शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.

MP Sanjay Raut : फडणवीसांनी डबक्यात उतरू नये; संजय राऊत यांचा विरोधी पक्षनेत्यांना सल्ला

पुणे- नाशिक महामार्गालगत राजगुरुनगर येथील बसस्थानक आवारात हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांचे एकत्रित स्मृती शिल्प आहे. परिसराच्या कमानीला शनिवारी (दि. 25) रात्री अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात कमानीचा एका बाजूचा खांब तुटला, तसेच पोलिसांकडून लावण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमेरा तुटला. यावरून हुतात्माप्रेमींमधून नाराजी व्यक्त झाली. याचे वृत्तांकन दै. ‘पुढारी’ने रविवारी (दि. 26) प्रसिद्ध केले.

Anand Mahindra qualification : आनंद महिंद्रांना नेटकर्‍याने विचारलं, तुमचं शिक्षण किती? ; उत्तराने सर्वांची मने जिंकली

या वृत्ताची दखल घेऊन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोमवारी (दि. 27) भेट दिली. झालेल्या नुकसानीची माहिती घेत त्याची दुरुस्ती दोन दिवसांत सुरू केली जाईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय बागेतील सर्वच फुलझाडांची योग्य प्रमाणात छाटणी तज्ज्ञ कारागिराकडून तातडीने यावेळी करण्यात आली.. कमानीच्या नुकसानीचे दै ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केले याबद्दल उपस्थित हुतात्माप्रेमींनी समाधान व्यक्त केले. जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे, मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, सेनेच्या महिला आघाडी प्रमुख विजयाताई शिंदे, दिनेश सांडभोर, माजी सरपंच मारुती सातकर, सुदाम कराळे, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे प्रकाश पाचारणे, प्रशांत कर्णावट, अमर टाटीया, कैलास दुधाळे आदी या वेळी उपस्थित होते.

Back to top button