पिंपरी : वरिष्ठ अधिकार्‍याने जबरदस्तीने ड्रिंक पाजून आयटी कंपनीतील महिलेवर केला लैंगिक अत्याचार | पुढारी

पिंपरी : वरिष्ठ अधिकार्‍याने जबरदस्तीने ड्रिंक पाजून आयटी कंपनीतील महिलेवर केला लैंगिक अत्याचार

पिंपरी : आयटी कंपनीमध्ये काम करीत असलेल्या महिलेला घरी बोलावून वरिष्ठ अधिकार्‍याने जबरदस्तीने ड्रिंक पाजून लैंगिक अत्याचार केला. ही घटना बावधन येथे जून 6 ते 10 या दिवशी घडली. आरोपी अभिनव दिलीपकुमार शांडिल्य (वय 31 रा. न्याती अपार्टमेंट, बावधन. मूळ- बिहार) हा बावधन येथील आयटी कंपनीमध्ये उच्चपदावर कार्यरत असून, फिर्यादी महिला ही त्याच कंपनीत कार्यरत आहे.

सातारा : मध्यरात्री महिला, मुले पाहून कार हायजॅक

या ओळखीतून त्याने फिर्यादी महिलेस घरी बोलावून, मद्य पाजून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, पुन्हा शारीरिक संबंधाची मागणी केली. याविरोधात महिला फिर्यादीने हिंजवडी पोलिस ठाण्यात शनिवारी (25 रोजी) रात्री सव्वा आठ वाजता फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून, अटक केली आहे.

Back to top button