पिंपरी : बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलेची फसवणूक | पुढारी

पिंपरी : बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलेची फसवणूक

पिंपरी : बनावट कागदपत्रांच्या आधारे तिघांनी मिळून एका महिलेची फसवणूक केली. ही घटना 8 जून 2020 ते 21 जून 2022 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडली. राहुल जालिंदर माने (रा. पिंपळे गुरव), एक महिला, अ‍ॅड. प्रशांत विश्वनाथ पानसरे (रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 64 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राहूल आणि प्रशांत यांनी संगनमत करून राहुल याची पिंपळे गुरव येथील सदनिका फिर्यादी यांनी खरेदी करावी यासाठी बनावट सर्च रिपोर्ट तयार केला. आरोपींनी तयार केलेल्या सर्च रिपोर्टवर फिर्यादी यांनी विश्वास ठेऊन सदनिका खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि आरोपीला पैसे दिले. त्यानंतर आरोपी महिलेने फिर्यादी यांच्या परस्पर त्या सदनिकेचे विनासंमती खरेदीखत करून फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Back to top button