आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीने नियुक्ती पत्र; गुन्हा दाखल करण्याचा आदेश | पुढारी

आयुक्तांच्या बनावट स्वाक्षरीने नियुक्ती पत्र; गुन्हा दाखल करण्याचा आदेश

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांच्या बनावट स्वाक्षर्‍या करून एकाला ‘शिपाई’ पदासाठी नियुक्ती पत्र दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बदल्यात संबंधिताने तीन लाख रुपये घेतल्याचे निदर्शनास आल्याने अधिकारीही चक्रावून गेले आहेत. याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आल्याचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

महापालिकेत काही महिन्यांपूर्वी अधिकार्‍यांच्या खोट्या स्वाक्षर्‍या आणि शिक्के मारून 1 कोटींची बोगस बिले तयार केल्याचे समोर आले होते. त्यानंतर काही महिन्यानंतर उपायुक्त राजेंद्र मुठे यांची खोटी स्वाक्षरी करून शिपाई भरतीचा बोगस प्रकार समोर आला होता. त्यानंतर थेट महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह अति. आयुक्त रवींद्र बिनवडे आणि माजी अति. आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या बनावट स्वाक्षरीने शिपाई पदाच्या भरतीचा बनावट आदेश तयार करण्यात आल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि.17) उजेडात आला.

उड्डाणपुलाच्या आधी रस्त्याचे काँक्रिटीकरण

याबाबत माहिती देताना अति. आयुक्त बिनवडे म्हणाले, ’सकाळी एक व्यक्ती शिपाई पदावर नियुक्ती झाल्याची ऑर्डर घेऊन कार्यालयात आला. त्यावेळी त्याच्याकडील ऑर्डर बनावट असल्याचे निदर्शनास आले. नियुक्ती पत्रावर 2021 या वर्षाची तारीख आहे.’ या नियुक्ती पत्रावर तीन वर्षांपूर्वी महापालिकेतून बदलून गेलेले अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यासह बिनवडे आणि सध्याचे आयुक्त विक्रम कुमार यांची बनावट स्वाक्षरी केल्याचे तत्काळ लक्षात आले.

संबंधितांकडे चौकशी केल्यावर गायकवाड नावाच्या व्यक्तीने या नोकरीसाठी संबंधिताकडून 3 लाख रुपये त्याच्या बँक खात्यावर ट्रान्सफर केल्याची माहिती मिळाली. हा प्रकार आयुक्त कुमार यांना समजल्यानंतर त्यांनीही तत्काळ गंभीर दखल घेऊन तातडीने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.

हेही वाचा

बेशिस्त वाहनचालकांना वेसण; स्वारगेट चौकात सर्व यंत्रणांची एकत्रित पाहणी

कोल्हापूरसह पंधरा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Tenth result : कोल्हापूर राज्यात दुसरे

Back to top button