उड्डाणपुलाच्या आधी रस्त्याचे काँक्रिटीकरण | पुढारी

उड्डाणपुलाच्या आधी रस्त्याचे काँक्रिटीकरण

पुणे, पुढारी वृत्तसेवा: चांदणी चौकाकडून भूगावकडे जाणार्‍या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी या उड्डाणपुलाच्या आधी 600 मीटर रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. हा रस्ता काँक्रिटीकरणाचा असणार आहे. चांदणी चौकातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी या चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून बहुमजली उड्डाणपूल साकारण्यात येत आहे. या उड्डाणपुलांचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

चांदणी चौकाकडून भुगावकडे जाणार्‍या रस्त्यावरही वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी भविष्यात वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपुलाच्या आधी ठिकाणच्या 600 मीटर रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. पालिकेच्या विकास आराखड्यात हा रस्ता 60 मीटर रुंद दर्शविण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात जागेवर तो केवळ 10 ते 12 मीटर असून, तो आता 40 मीटरपर्यंत रुंद करून त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे.

बेशिस्त वाहनचालकांना वेसण; स्वारगेट चौकात सर्व यंत्रणांची एकत्रित पाहणी

त्यासाठीच्या 2 कोटी 38 लाख रुपयांच्या खर्चास महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. या रस्त्यावर भविष्यात उड्डाणपूल अथवा ग्रेडसेपरेटर बांधण्याचे नियोजन असल्याचा प्रस्ताव ठेवत या खर्चास मान्यता दिली आहे. या परिसरात अनेक बड्या बांधकाम व्यावसायिकांनी जागा घेतलेल्या असून, काही बड्या राजकीय व्यक्तींच्याही जागा आहेत. त्यातच या भागात कोंडीबाबत अथवा पुलाबाबत कधीही महापालिकेकडे मागणी नसल्याचे प्रशासनच सांगत आहे.

त्यामुळे चांदणी चौकापासून या प्रस्तावित पुलापर्यंतचे अंतर एक ते सव्वा किलोमीटर असताना केवळ 600 मीटरचेच रुंदीकरण का? तसेच या रस्त्यातच एक अवघड वळण असतानाही त्याचे रुंदीकरण करण्याऐवजी याच ठिकाणी पुलाचा घाट का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा

कोल्हापूरसह पंधरा जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Tenth result : कोल्हापूर राज्यात दुसरे

भीतीपोटी मुलीची आत्महत्या अन् मिळाले 81 टक्के गुण

Back to top button