पिंपरी : कार्ड अपग्रेड करण्याच्या बहाण्याने फसवणूक, गुन्हा दाखल | पुढारी

पिंपरी : कार्ड अपग्रेड करण्याच्या बहाण्याने फसवणूक, गुन्हा दाखल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा
क्रेडिट कार्ड अपग्रेड करण्याच्या बहाण्याने मोबाईलवर लिंक पाठवून एकाची 98 हजार 390 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 1 जून रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास हिंजवडी येथे ऑनलाइन स्वरूपात घडली. याप्रकरणी अनिल जगदीश परदेशी (33, रा. हिंजवडी अपार्टमेंट, डांगे चौक) यांनी सोमवारी (दि .13) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

माजी खेळाडू, पंचांच्या निवृत्तीवेतनात भरघोस वाढ

त्यानुसार, अनोळखी मोबाईल धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने फिर्यादी यांच्या मोबाईलवर फोन करून बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांच्या बँकेचे क्रेडिट कार्ड अपग्रेड करण्याच्या बहाण्याने आरोपीने फिर्यादी यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवली. फिर्यादी यांनी लिंकवर क्लिक केले असता त्यांच्या क्रेडिट कार्डवरून 98 हजार 300 रुपये दुसर्‍या खात्यावर हस्तांतरित झाले.

Back to top button