महिला घरकामगारांनी केल्या विविध मागण्या | पुढारी

महिला घरकामगारांनी केल्या विविध मागण्या

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: अखिल भारतीय जनवादी महिला संघटना आणि पुणे जिल्हा घरकामगार संघटनांचे शहरातील विविध ठिकाणी मेळावे सुरू आहेत. यावेळी महिला घरकामगारांनी विविध मागण्या केल्या. यावेळी डीवाएफआयचे पिंपरी चिंचवड सचिव अमीन शेख, शिवराय अवलोल, नंदा शिंदे, संगीता देवळे, आशा बर्डे, रिया सागवेकर, मंगल सूर्यवंशी, लता वाव्हलकर आदी उपस्थित होते.

यावेळी घरकामगारांना प्रत्येक कामामागे दोनशे रुपये दर वाढवून द्या. तसेच आठवड्यात एक सुट्टी मिळावी. घरात कुणी पाहुणे आले तर त्या अतिरिक्त कामाचे वेगळे पैसे आकारावेत, या मागण्या करण्यात आल्या. बिजलीनगर आणी वाल्हेकरवाडीच्या मेळाव्यात चर्चा करून वरील मागण्यासाठी प्रशसकीय पातळीवर व वेळ आल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेऊ, असा निर्णय घेण्यात आला. मेळाव्यास आ. भा. जनवादी महिलां संघटनेच्या नेत्या व राज्य कमिटी सदस्य अपर्णा दराडे यांनी मार्गदर्शन केले.

तसेच जनवादी महिला संघटनेच्या वतीने सरकारच्या दारु धोरणाविरोधात महिलांमध्ये प्रचार करून महाराष्ट्रातून एक लक्ष सह्याचे निवेदन मुख्यमंत्री यांना देण्याचे असून या मोहिमेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करून महाराष्ट्राला दारूचे कोठार होऊ देणार नाही, असा महिलांनी एक मुखाने निर्णय घेतला.

Back to top button