थकबाकी भरा, अन्यथा कारवाई : जेजुरी मुख्याधिकार्‍यांचा इशारा | पुढारी

थकबाकी भरा, अन्यथा कारवाई : जेजुरी मुख्याधिकार्‍यांचा इशारा

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा

सन 2021-22 या आर्थिक वर्षात ज्या नागरिकांनी कराची बिले पाठवूनही मालमत्ताकर, पाणीपट्टी, इतर कराची रक्कम भरली नाही, त्या मालमत्ताधारकांनी दि. 17 जूनअखेर कर भरावेत; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा जेजुरीचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी दिला.

खेलो इंडिया यूथ गेम्स : कोल्हापूरच्या तिघांना सुवर्ण

जेजुरी नगरपालिकेचे 2022-23 हे वित्तीय वर्ष सुरू झाले असून सन 2021-22 या वर्षाची कराची बिले पाठवूनही अद्याप मालमत्ता कर, पाणीपट्टी व इतर कराची रक्कम भरली नाही अशी रक्कम नगरपालिका अधिनियमातील कलम 152 च्या तरतुदीनुसार जप्तीची कारवाई करून वसूल करता येते.

महाराष्ट्रात नोकऱ्या मिळवण्यासाठी यूपीत मुलांना मराठी शिकवा, महाराष्ट्रातील भाजप नेत्याचे योगींना पत्र

त्यानुसार जप्तीची कारवाई करणे, नळ कनेक्शन तोडणे, थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात जाहीर करणे, चौकाचौकात फ्लेक्स लावून नावे प्रसिद्ध करणे आदी कारवाई सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी मिळकत व पाणी कराची देय रक्कम जेजुरी नगरपरिषदेत 17 जूनअखेर भरून संभाव्य कारवाई टाळावी व पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी केले आहे.

Back to top button