खेलो इंडिया यूथ गेम्स : कोल्हापूरच्या तिघांना सुवर्ण | पुढारी

खेलो इंडिया यूथ गेम्स : कोल्हापूरच्या तिघांना सुवर्ण

पंचकुला : पुढारी वृत्तसेवा
हरियाणा पंचकुला येथे सुरू असलेल्या चौथ्या खेलो इंडिया यूथ गेम्स 2022 या राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील कबनूर (इचलकरंजी) येथील अनिकेत सुभाष माने (मूळ गाव हरोली, ता. शिरोळ) याने उंच उडी प्रकारात 2.07 इतकी उंच उडी मारून सुवर्णपदक मिळवले. तसेच आपल्या नावावर एका नव्या विक्रमाची नोंद केली. याशिवाय या स्पर्धेत कोल्हापूरच्या नरसिंग पाटील (सरवडेे) आणि शुभम पाटील (खुपिरे) या दोन मल्लांनी कुस्तीमध्ये सुवर्णपदके तर रोहित पाटील (बाणगे) रौप्यपद व संकेत पाटील (आमशी) याने कांस्यपदक मिळवले. सायकलपटू पूजा दानोळे हिने रूपेरी कामगिरी केली.

Back to top button