‘पुढारी एज्युदिशा’ प्रदर्शनाला दिमाखात प्रारंभ | पुढारी

‘पुढारी एज्युदिशा’ प्रदर्शनाला दिमाखात प्रारंभ

पुणे ; पुढारी वृत्तसेवा :    राज्यातील विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असलेल्या संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘पुढारी एज्युदिशा ऑनलाईन 2021’ या शैक्षणिक प्रदर्शन आणि वेबिनार मालिकेचे शनिवारी दिमाखदार उद्घाटन होऊन एज्युदिशा कार्यक्रमाला प्रारंभ झाला आहे.

पहिल्याच दिवशी करिअरसंदर्भातील माहितीचा खजिना आणि शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन वाटा दाखविणार्‍या नामवंत शैक्षणिक संस्थांसह तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना मिळाले.

यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले.

प्रदर्शनाचे सहयोगी प्रायोजक एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी पुणे तर सहप्रायोजक डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे व पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पुणे हे आहेत.

रविवारी (दि. 8) आणि सोमवारी (दि. 9) सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सर्वांसाठी हे प्रदर्शन विनामूल्य असणार आहे.

पहिल्याच दिवशी मुंबईच्या लॉ अँड ऑर्डरचे जॉईंट सी. पी. विश्‍वास नांगरे-पाटील यांनी करिअर कसे निवडावे, संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील यांनी स्वत:ला ओळखा आणि स्वत:ला घडवा,

डीन ऑफ इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शनचे शीतलकुमार रवंदळे यांनी कोव्हिडनंतरची प्लेसमेंट परिस्थिती तर आयटी प्रोफेशनल दीपक शिकारपूर यांनी ‘आयटी क्षेत्रातील संधी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ या विषयांवर विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले.

शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या संधीविषयी माहिती मिळाली.

यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी आनंद व्यक्‍त करत विद्यार्थ्यांसाठी गरजेचा आणि उपयुक्‍त असा उत्तम उपक्रम असल्याचा अभिप्राय दिला.

दै. ‘पुढारी’च्या वतीने 2009 पासून ‘पुढारी एज्युदिशा’ शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले जाते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांकरिता यंदा प्रथमच ऑनलाईन स्वरूपाचे राज्यस्तरीय प्रदर्शन घेण्यात येत आहे.

दहावी-बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांपुढे शिक्षणाची अनेक दालने असतात. विद्यार्थी व पालक करिअरची दिशा ठरविण्याविषयी योग्य पर्यायाच्या शोधत असतात.

अशावेळी विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय ठेवून त्यांना करिअरबाबत योग्य मार्गदर्शन व्हावे, या हेतूने दै. ‘पुढारी’ने 12 वर्षांपूर्वी एज्युदिशा शैक्षणिक प्रदर्शनाची सुरुवात केली.

दरवर्षी प्रत्यक्ष होणारे हे प्रदर्शन कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे यावर्षी ऑनलाईन पद्धतीने होत आहे. तरीदेखील शैक्षणिक संस्था, पालक आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

असे पाहता येईल एज्युदिशा प्रदर्शन 

प्रदर्शनात दरवर्षीप्रमाणे निरनिराळ्या विद्या शाखांची 35 हून अधिक दालने आहेत. www.pudhariexpo.com या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर प्रदर्शनात सहभागी होता येणार आहे.

यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रदर्शन हॉल व लेक्चर हॉल, असे दोन पर्याय असतील. यात प्रदर्शन हॉलमध्ये शैक्षणिक संस्थांचे स्टॉल दिसतील.

त्यामध्ये विविध शिक्षण संस्थांची माहिती, व्हिडीओ तसेच इतर माहिती मिळेल. त्याचबरोबर संबंधित शिक्षण संस्थेस ऑडीओ व व्हिडीओ कॉल करता येणार आहे.

एज्युदिशा व्याख्यानांचे वेळापत्रक

क्र. व्याख्याते विषय तारीख वेळ
1 इंद्रजित देशमुख  (एम. आर. डी. एस.) आताच्या काळात स्वत:ला मोटिव्हेटेड कसे ठेवावे 8 ऑगस्ट स. 11:00 वा.
2 हर्षद ठाकूर (इनोव्हेशन ऑफिसर) अभियांत्रिकीमधील नवकल्पना 8 ऑगस्ट दु. 3:00 वा.
3 अरविंद जगताप, लेखक कलेमधून पैसे मिळतात का? 9 ऑगस्ट स.11:00 वा.
4 दिलीप सातभाई, (सी.ए.) कॉमर्समधील करिअरच्या संधी 9 ऑगस्ट दु. 3:00 वा.
5 दिलीप ओक (फाऊंडर ऑफ ओक्स अ‍ॅकॅडमी) परदेशातील शिक्षणाच्या संधी 9 ऑगस्ट सायं. 5:00 वा.  

Back to top button