पुणे : मातीच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या युवकावरच चढविला ‘हायवा’; युवकाचा मृत्यू | पुढारी

पुणे : मातीच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या युवकावरच चढविला ‘हायवा’; युवकाचा मृत्यू

भिगवण : पुढारी वृत्तसेवा

वीटभट्टीसाठी लागणाऱ्या माती खेपाची घाई भिगवणमधील तरुणाच्या जीवावर बेतली. रात्रीच्या सुमारास घाईघाईने मातीची खेप खाली करायला आलेल्या हायवा चालकाने मातीच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या युवकाच्या अंगावरच हायवा घातल, शिवाय अख्खा मातीचा टिपर त्याच्या अंगावर रिकामा केल्याने भिगवणच्या ज्ञानेश्वर राजेंद्र बिबे (वय २७) या युवकाचा ढिगाऱ्याखाली दबून जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास भिगवण (ता. इंदापुर) येथे घडली.

राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर

विशेष म्हणजे एवढा प्रकार घडूनही चालकाच्या ही बाब लक्षात न आल्याने तो मातीची दुसरी खेप आणण्यासाठी निघुन गेल्याची चर्चा घटनेनंतर होती. कुटुंबातील लोकांनी ज्ञानेश्वरशी मोबाईलवर संपर्क केल्यानंतर प्रतिसाद न मिळाल्याने हा प्रकार उघडकीस आला. जेसीबीच्या सहाय्याने ढिगाऱ्याखाली दबलेल्या ज्ञानेश्वरला बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळाली.

Monsoon : तयारीला लागा! मान्सून वेळेआधीच दाखल होणार, हवामान विभागाचा अंदाज

भिगवण पोलिसांनी हायवा चालकाविरुद्ध अविचाराने व हायगयीने हायवा (एमएच ४२ एक्यू ४७३१) पाठीमागे चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याने अज्ञात हायवा चालक विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची फिर्याद ज्ञानेश्वर याचा भाऊ अशोक बिबे यांनी दिली.

उर्मिला आणि आदिनाथ कोठारे यांच्यात खरंच दुरावा ? कुजबूज वाढण्याला तिसरे कारण मिळाले !

माती माफियांचा सुळसुळाट

या घटनेमुळे रॉयल्टी चुकवण्यासाठी माती माफियांची रात्रीची स्पर्धा जीवावर बेतणारी ठरल्याची जोरदार चर्चा आहे. भिगवण व परिसरात मोठ्या प्रमाणात वीटभट्टी व्यवसाय वर्षानुवर्षे सुरू आहे. या वीटभट्टीला दैनंदिन मोठ्या प्रमाणात माती लागते. साहजिकच कायदेशीर माती परवडणारी नसल्याने महसूल व इतर विभागाशी अर्थपूर्ण मैत्रीचे संबंध या वीटभट्टी चालकांनी निर्माण केले आहेत. त्यामुळे भट्टीला लागणारी माती रात्रीच्या वेळी वाहतूक केली जाते. यातून रॉयल्टी व इतर सर्वच लाखो रुपयांचा खर्च वाचत असल्याने बेकायदेशीर मातीची मोठी उलाढाल होत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

Back to top button