पिंपरी : निगडी येथे महिलेचा विनयभंग | पुढारी

पिंपरी : निगडी येथे महिलेचा विनयभंग

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात तिघांनी एका महिलेचा विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. 20) सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास सोमेश्वर गार्डन जवळ, प्राधिकरण, निगडी येथे घडली.

भडक भाषणे करून पोट भरत नाही, सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंवर निशाणा

ज्ञानेश्वर सासवडकर, श्रीकांत सासवडकर आणि राजेश स्वामी (तिघेही रा. प्राधिकरण, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

नाफेडच्या निर्णयाने कांदा दराच्या घसरणीला ब्रेक

याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने बुधवारी (दि. 20) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी राहात असलेल्या बिल्डींगमध्ये साफसफाई करत असताना खिडकीतून पाणी सांडले.

अटल निवृत्तीवेतन योजनेची ४ कोटींहून अधिक नोंदणी

यावरून त्यांचे सासू-सासरे शिवीगाळ करत असताना त्यांचे शेजारी आरोपी ज्ञानेश्वर सासवडकर यांनी फिर्यादी महिलेचा विनयभंग केला. तसेच आरोपी श्रीकांत सासवडकर आणि राजेश स्वामी यांनी फिर्यादी यांना मारहाण करण्यासाठी अंगावर धावून आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळ तपास करीत आहेत.

 

Back to top button