जेजुरीत त्रैलोक्य शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी | पुढारी

जेजुरीत त्रैलोक्य शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा

जेजुरीगडाच्या मंदिरात व शिखरावर असणाऱ्या स्वर्गलोकी, भूलोकी व पाताळलोकी (त्रैलोक्य) शिवलिंगाचे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी दर्शन घेतले. पहाटेपासूनच शिवलिंगाच्या दर्शनसाठी भाविकांनी जेजुरी गडावर गर्दी केली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी जेजुरी गडावर जावून त्रैलाेक्य शिवलिंगाचे दर्शन घेवून कुलधर्म कुलाचाराप्रमाणे धार्मिक विधी केले.

दक्षिण काशीत उत्साह

जेजुरीला दक्षिणेकडील कशी मानले जाते. कैलास पर्वतानंतर जेजुरी गडावर शंकर व पार्वतीचे एकत्रित स्वयंभू शिवलिंग पाहण्यास मिळते. म्हणून महाशिवरात्री यात्रेला येथे वेगळे महत्व आहे. जेजुरी गडाच्या मुख्य मंदिरावरील शिखरात असणारे शिवलिंग हे स्वर्गलोकी शिवलिंग मानले जाते. तर गडावरील मुख्य मंदिरातील स्वयंभू लिंग हे भूलोकी शिवलिंग मानले जाते आणि गाभाऱ्यातील मुख्य मंदिराशेजारी असणाऱ्या गुप्त मंदिरातील तळघरात असणारे शिवलिंग हे पाताळलोकी शिवलिंग मानले जाते.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय लेकरांच्या सुटकेसाठी मोदी सरकारकडून हवाई दलास पाचारण

त्रैलोक्य शिवलिंगाचे दर्शन; शिखरातील स्वर्गलोकी शिवलिंग

जेजुरी गडावरील शिखारातील स्वर्गलोकी शिवलिंग.

स्वयंभू भूलोकी शिवलिंग

मुख्य मंदिराच्या तळघरातील पाताळलोकी शिवलिंग

जेजुरी गडाच्या मुख्य मंदिराच्या तळघरातील पाताळलोकी शिवलिंग.

महाशिवत्रीलाच त्रैलोक्य दर्शनाचा लाभ

मुख्य मंदिरातील स्वयंभू शिवलिंग हे दर्शनासाठी रोज खुले असते तर मंदिराच्या शिखरावरील व मुख्य मंदिरातील तळघरातील शिवलिंग हे केवळ वर्षातून एकदा महाशिवरात्रीलाच दर्शनासाठी उघडले जाते. महाशिवरात्रीला जेजुरी गडावर त्रैलोक्य दर्शनाची मोठी पर्वणी असल्याने हजारो भाविक हा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी करीत असतात.

युक्रेनमध्‍ये बॉम्‍बहल्‍ल्‍यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्‍यू

मध्यरात्री १२ वाजेपासून दर्शनाला रांग

महाशिवरात्रीनिमित्त सोमवारी (दि. २८ फेब्रुवारी) मध्यरात्री १२ वाजता शिखरावरील व मंदिराच्या तळ घरातील शिवलिंग उघडण्यात आले. पहाटे एक वाजता मानकरी सोनवणे व वासकर यांची महापूजा व अभिषेक झाल्यानंतर भाविकांना त्रैलोक्य शिवलिंग दर्शन खुले करण्यात आले. यावेळी श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे, विश्वस्त शिवराज झगडे, संदीप जगताप, तुषार सहाने, प्रसाद शिंदे, देवाचे पुजारी गुरव, वीर, घडशी, कोळी, तसेच नित्य सेवेकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. दर्शनासाठी पहाटे तीन वाजेपासून हजारो भाविकांनी जेजुरी गडावर रांगा लावल्या होत्या. दिवसभर हजारो भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. हार, बेल, पाने, दवणा, फुले या बरोबरच देवाचे लेण असणारे भंडार, खोबरे देवाला अर्पण करण्यात आले.

Ukraine Invasion : व्लादिमीर पुतीन यांना धक्का, ब्लॅक बेल्ट काढून घेतला!

मान्यवरांची हजेरी

खासदार सुप्रिया सुळे यांनी महाशिवरात्रीनिमित्त सकाळी जेजुरी गडावर येवून श्री खंडेरायाचे व तिन्हीही शिवलिंगाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर कुलधर्म कुलाचाराप्रमाणे तळीभंडाराचा विधी केला. यावेळी जेजुरीतील नगरसेवक जयदीप बारभाई, माजी नगरसेवक मेहबूब पानसरे उपस्थित होते. श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने कोरोना नियमाचे पालन करून दर्शन व्यवस्था केली होती. पहिल्याच सज्जावरून जीना तयार करून मंदिरावरील शिखरातील शिवलिंगाच्या दर्शनासाठी व्यवस्था केल्याने भाविकांना लवकर दर्शन घेता आले.

Russia-Ukraine War : युक्रेनच्या शेतकऱ्यानं चक्क ट्रॅक्टरनं रशियन रणगाडाच पळवला (video)

Back to top button